साईबाबा संस्थानला चार कोटींच्या दंडाची नोटीस

सामना ऑनलाईन, शिर्डी

गेल्या शंभर वर्षांत साईबाबा संस्थानने मंदिर परिसरातील अनेक जमिनींचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर राहत्याच्या तहसीलदारांनी साईबाबा संस्थानच्या ताब्यातील या जागा नियमानुसार करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस साईबाबा संस्थानला बजावली आहे. दरम्यान, साई समाधी शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर महसूल प्रशासनाला जाग आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या