मुंबई विकास आराखडय़ाची अधिसूचना जारी

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

विकासकांवर एफएसआयची बरसात करून औद्यागिक बांधकामांसाठी ५ एफएसआय तर निवासीसाठी ३ एफएसआय देणाऱया मुंबई विकास आरखडय़ाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने काढलेल्या या अधिसूचनेवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना ३० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर या विकास आराखडय़ात काही बदल करून त्याला अंतिम मंजुरी मिळेल.

मुंबई शहराच्या विकासाचा, कोळीवाडे, गावठाणे, झोपडपट्टय़ा यांचे भवितव्य ठरविणारा विकास आराखडा २४ एप्रिल रोजी मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या अनेक सूचनांनुसार या विकास आराखडय़ात बदल करून विकास आराखडा मंजूर केला आहे. राज्य सरकारकडूनही काही बदल केले असून हे बदल अधिसूचनेद्वारे www.maharashtra.gov.in संकेतस्थळाकर कायदा व नियम विभागात नमूद करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या