भ्रष्ट नेते, लाचखोरांनी माझ्या पार्थिवास हात लावू नये; कोल्हापुरातील जवानाचा व्हिडिओ व्हायरल

48

कोल्हापूर – ‘‘मी सैनिकी सेवा बजावत असताना वीरमरण आल्यास नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाऱयांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये, ही माझी शेवटची इच्छा असेल. सन्मानाने जगण्यासाठी आणि भुंकणाऱया या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळय़ांनो, संघटित व्हा’’ अशा शब्दांत चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे येथील लान्स हवालदार रणजीत गावडे या जवानाने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओत आणि गावात लावलेल्या ‘मी कोण?’ या आशयाच्या पोस्टरमुळे खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षभरापासून सैनिकांप्रति आक्षेपार्ह विधाने करण्याची परंपरा सुरू आहे. त्याचा निषेध म्हणून जवान रणजीत गावडे यांनी हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. हीच भावना हजारो सैनिकांची असल्याचे सांगताना सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाऱया कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळय़ांनो संघटित व्हा, असे आवाहनही जवान गावडे यांनी केले.

जवानही रंगले होळीच्या रंगात

होळीच्या पारंपरिक रंगोत्सवाचा आनंद सोमवारी त्रिपुराच्या अखौरा सीमेवर खडा पहारा देणाऱया हिंदुस्थानी सीमा सुरक्षा बल आणि बांगलादेश बॉर्डर गार्डच्या जवानांनी रंगात रंगून घेतला. उभय देशांच्या लष्करी जवानांनी एकमेकांना रंग लावून धुळवडीच्या शुभेच्छाही दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या