
सध्या चित्रपटांमध्ये न्यूड सिन देणं, न्यूड फोटोशूट करणं हा सध्याच्या अभिनेत्री व मॉडेल्सचा ट्रेंड झाला आहे. अशा फोटोशूट्समधून मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या करिअरला उंचावर नेऊन ठेवण्यास मदत करते. असेच फोटोशूट करून एका मॉडेलने सध्या इंस्टाग्रामवर खळबळ माजवली आहे.
View this post on Instagram#Narthaki #Dancer #DancingDiva #NikitaGokhale #nikitagokhalestyle #Model #nikitagokhalenude @arnekrw
निकिता गोखले असे त्या मॉडेलचे नाव असून तिचे इंस्टाग्रावरचे फोटो पाहिल्यावर डोळे विस्फारून गेल्याशिवाय राहणार नाही. निकिताने न्यूड फोटोशूट केलेले आहेत. या फोटोशूटवरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र निकिताने त्या सर्व टीकांकडे दुर्लक्ष करत तिचे न्यूड फोटो टाकणे सुरूच ठेवले आहे.
निकिता ही मूळची महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तुमसूर या गावातील आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तुमसूर येथून केल्यानंतर ती नागपूर येथे शिफ्ट झाली. तिथे तिने शेअर मार्केटशी निगडीत अभ्यास केला. त्यानंतर ती आयआयएफएलमध्ये कामाला लागली. मात्र त्यानंतर मॉडेलिंग व अभिनयात तिने नशीब आजमवायचं ठरवलं. त्यासाठी तिने अनुपम खेर यांच्या फिल्म अॅकॅडमीमध्ये व टेरेन्स लुईसच्या डान्स अॅकॅडमीत प्रवेश घेतला. तिथून तिच्या मॉडेलिंगच्या करिअरला सुरुवात झाली.
निकिताने आतापर्यंत मिस इंडिया बिकीनी 2015 व मिस ग्लॅमर फेस वर्ल्ड 2016 या स्पर्धा जिंकल्या आहेत. तर मिस वर्ल्ड बिकीनी 2015 स्पर्धेत अंतिम फेरीत आली होती. वर्ल्ड स्विमसूट मॉडेल 2017 स्पर्धेत ती अंतिम तिघींमध्ये होती. निकिताचे हॉटफोटोशूट पाहून तिला प्लेबॉय या प्रसिद्ध मासिकाकडून फोटोशूटचे आमंत्रण आले होते. मात्र देशभरातून निकिताचा मोठा विरोध झाल्यानंतर तिने ते फोटोशूटचे आमंत्रण नाकारले होते. निकिताने ‘कॉलेज’ नावाच्या मराठी चित्रपटातही काम केले आहे.