‘न्यूड योगा’ करणारी तरुणी आहे तरी कोण? फिटनेसची बॉलिवूडकरांनाही पडली भुरळ

हॉलिवूडसह बॉलिवूड आणि टीव्ही इंटस्ट्रीमध्येही सध्या फिटनेसची क्रेझ दिसून येत आहे. अभिनेत्री मलायका अरोरा, करीना कपूर-खान आणि टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया यांचे योगा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या अभिनेत्रींच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. परंतु तुम्ही ज्यांच्या फिटनेसचे दिवाने आहेत त्यांनाही भुरळ घालणारे एक अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे. त्या तरुणीचे लाखो फॉलोअर्स असून सिनेकलाकारांनाही तिने भुरळ घातली आहे.

इन्स्टाग्रामवर NUDE YOGA GIRL नावाचे एक अकाऊंट आहे. NUDE YOGA GIRL या अकाऊंटचे 10 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. अनेक कठीण योग मुद्रा करताना या महिलेचे फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.

सोशल मीडियावर आपल्या योगाच्या सहाय्याने एवढा तगडा चाहता वर्ग असणारी ही न्यूड योगा गर्ल कोण आहे आहे. तिचे नाव काय याची काहीच माहिती इन्स्टाग्रामवर उपलब्ध नाही. पण हॉलिवूड आणि मलायका, आशकासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी तिला फॉलो करतात.

NUDE YOGA GIRL हे इन्स्टाग्राम अकाउंट 2015मध्ये सुरू करण्यात आले आहे. यावर एक महिला योगच्या अनेक मुद्रांमध्ये तिचे नग्न फोटो शेअर करत असते. या सर्व फोटोंमध्ये शरीर एका सुंदर कालाकृतीच्या रुपात दाखवण्यात आले आहे. या अकाउंटची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, टीवी अभिनेत्री एबीगल पांडे, निशा रावल, आशका गोराड़िया सारख्या अनेक अभिनेत्री हे अकाउंट फॉलो करतात.

आपली प्रतिक्रिया द्या