पुणे – चार दिवसांत ॲक्टिव्ह रूग्ण पाच हजारांनी घटले

मागील तीन ते चार दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत काही प्रमाणात घट होत असल्यामुळे एकूण ॲक्टीव्ह रूग्णसंख्येतही घट निर्माण होत आहे.18 एप्रिल रोजी 56 हजार 636 वर गेलेली शहरातील एकूण ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या गुरूवारच्या (दि.22) रिपोर्टनुसार 51 हजार 522 वर आली आहे.या चार दिवसांच्या कालावधीत एकूण ॲक्टीव्ह रूग्णसंख्येत 5 हजार 84 ने घट झाली आहे,

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जवळपास दिडशे ते दोनशेच्या घरात आलेल्या रूग्णसंख्येने तब्बल साडेसात ते दोनशेच्या घरात आलेल्या रूग्णसंख्येने तब्बल साडेसात हजारांचा आकडा पार केला.दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या रूग्णसंख्येमुळे एकूण ॲक्टिव्ह रूग्णसंख्येतही मोठी वाढ होत गेली.चौदाशे ते पंधराशेच्या घरातील या रूग्णसंख्येने 18 एप्रिलपर्यंत 56 हजारांचा टप्पा पार केला होता.मात्र,मागील तीन ते चार दिवसांमध्ये नव्याने आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत घट होत आहे.या घटत्या रूग्णसंख्येमुळे एकूण ॲक्टीव्ह रूग्णसंख्येतही घट होत चालली असून,चार दिवसांपूर्वी 56 हजार 636 वर असलेली रूग्णसंख्या गुरूवारी 51 हजार 552 वर आली आहे.

विभागात 10 लाख 47 हजार रूग्ण

पुणे विभागात एकूण रूग्णसंख्या 10 लाख 47 हजार 391 झाली असून,यात पुणे जिल्ह्यात सात लाख 53 हजार 353,सातारा 86 हजार 434,सोलापूर 83000 हजार 911,सांगली 64 हजार 293,कोल्हापूरमध्ये 59 हजार 400 अशी रूग्णसंख्या आहे,पूर्णपणे बरे झालेल्या आठ लाख 84 हजार 441 जणांना घरी सोडण्यात आले असून,एक लाख 42 हजार 862 रूग्ण आहेत.20 हजार 88 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.विभागात बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण 84.44 टक्के आहे.

गुरुवारी शहरात दिवसभरात 4539 नवे रूग्ण ;80 मृत्यू

शहरात गुरूवारी (दि.22) दिवसभरात 22 हजार 277 नागरीकांची तपासणी करण्यात आली.यात चार हजार 539 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले,तर 4 हजार 851 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.दिवसभरात 80 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून,यात पुण्याबाहेरील 24 जणांचा समावेश आहे.शहरात आजपर्यंत तीन लाख 87 हजार 30 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.यातील तीन लाख 29 हजार 148 जण बरे झाले आहेत.अक हजार 313 गंभीर रूग्णांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.शहरातील एकूण मृत्यूसंख्या सहा हजार 330 वर पोहचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या