नूपुर शर्मा यांच्या अटकेला मनाई; सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये वर्ग केले एफआयआर

Nupur-Sharma

प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्यावरील वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या नूपुर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील सर्व एफआयआर दिल्लीत वर्ग करण्यात आले आहेत. आपल्याविरोधातील सर्व याचिका दिल्लीत वर्ग करण्याची मागणी शर्मा यांच्याकडून करण्यात येत होती. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेलाही मनाई केली आहे.

शर्मा यांच्याविरोधात दाखल एफआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे करावी, अशी सूचनाही शर्मा यांना न्यायालयाने केली आहे. शर्मा यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलीस आता याचा तपास करणार आहेत. शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याचेही काही गोष्टीवरून निदर्शनास आल्यास दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातील सर्व एफआयआर दिल्लीत वर्ग करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलीस सर्व एफआयआरचा एकत्रित तपास करणार आहेत.

तपास यंत्रणेवर कोणत्याही अटीशर्ती नाही. तसेच नूपुर यांच्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल झाला तर शर्मा यांना अटक होणार नाही. तो एफआयआर दिल्लीकडे वर्ग करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.