आमीर खानच्या लेकीला ब़ॉयफ्रेंडने मॅऱेथॉनदरम्यान केले प्रपोज, पाहा त्यांचा क्यूट व्हिडीओ

अभिनेता आमीर खान याची लेक आयरा खान ही कायम तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असते. बॉलिवूडच्या लाईमलाईटपासून ती दूर राहत असली तरी सोशल मीडियावरून तिच्या आयुष्यात काय सुरू आहे ते सर्वांना समजत असतं. आयरा ही गेल्या काही वर्षांपासून नुपूर शिखरे या तरुणाला डेट करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपूर हा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तो अनेक सेलिब्रिटींना ट्रेनिंग देत असतो. नुपूरने नुकताच इटली येथील आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेच्या वेळी त्याने सर्वांदेखत आयराला प्रपोज केले आहे. आयराने देखील त्याला होकार दिला आहे. तिने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने “पॉप आय : ती होय म्हणाली, आयरा : हाहा.. मी हो म्हणाले”, असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच फातिमा सना शेख, सारा तेंडुलकर, तेजस्विनी पंडीत या सेलिब्रिटींनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे.