परिचारिकेवर रुग्णालय कर्मचाऱ्यांचा बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल

1865
प्रातिनिधिक फोटो

खासगी रुग्णालयातील परिचारिकेवर तिथल्याच डॉक्टरसह तीन जणांनी वर्षभर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. राजस्थान येथील बाडमेर येथे ही घटना घडली असून या तिघांनी अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल केल्याचंही समोर आलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता नोव्हेंबर 2016पासून या खासगी रुग्णालयात काम करते. वर्षभरापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठीच्या आरामासाठी आरक्षित खोलीत ती असताना एका कर्मचाऱ्याने तिला ज्यूस पाजला. त्यात गुंगी आणणारं औषध मिसळलं होतं. महिला बेशुद्ध पडल्यानंतर अशोक नावाच्या कंपाऊंडरने तिच्यावर बलात्कार केला आणि त्या घटनेचा एक व्हिडीओही बनवला. त्या व्हिडीओच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. काही महिन्यांनंतर रुग्णालय संचालक डॉ. सुरेंद्र माहेश्वरी यानेही त्या व्हिडीओबाबत माहिती असल्याचं सांगत तिच्यावर बलात्कार केला. सुरेंद्रचा भाऊ प्रेमकुमार यानेही तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला.

सुमारे वर्षभर हे तिघेही तिचं लैंगिक शोषण करत होते. 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्रने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आणि हे प्रकरण वाढू नये म्हणून तिला 16 ऑगस्ट रोजी कामावरून काढून टाकलं. महिलेने या प्रकरणी पोलिसात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या