म्हणून पंतप्रधानांनी मागितली माफी, डोळ्यात अश्रू तरळले

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी ब्रिटनची पर्यटक ग्रेस मिलाने हिच्या कुटुंबाची भेट घेतली. पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी मिलानेच्या कुटुंबाची माफी मागितली. यावेळी त्या अतिशय भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

ग्रेस मिलाने ही महिला पर्यटक 1 डिसेंबरला आपल्या 22 व्या जन्मदिनाआधी न्यूझीलंडमधून बेपत्ता झाली होती. रविवारी ऑकलंड पार्कबाहेर तिचा मृतदेह मिळाला होता. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मिलानेच्या हत्याकांडातील आरोपीला पहिल्यांदाच न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान आर्डर्न भरल्या गळ्याने म्हणाल्या की, ‘या हत्याकांडामुळे आमच्या देशाला लाजिरवाणे वाटत आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडून मी मिलानेच्या कुटुंबाची माफी मागते. तुमची मुलगी आमच्याकडे सुरक्षित राहायला हवी होती परंतु तसे घडले नाही. मी पुन्हा एकदा माफी मागते.’

आपली प्रतिक्रिया द्या