रेसिपी : ओट्स आणि गुळाचे पौष्टीक लाडू

3035

pratik-poyrekar-chefदररोज सकाळी गूळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते असं म्हटलं जातं. ओट्स हे डाएट करणाऱ्यांचं खाद्य. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून शेफ प्रतीक पोयरेकर यांनी ओट्स आणि गुळाचे पौष्टीक लाडू तयार केले आहेत. वाचा या पौष्टिक लाडूंची पाककृती…

साहित्य :
– एक वाटी ओट्स, अर्धी वाटी गूळ, आवश्यकते नुसार तूप, आवडीनुसार काजू, मनुका,  बदाम, शेंगदाणे, चिमुटभर वेलची पूड

कृती :

– प्रथम ओट्स कढईत खरपूस भाजून घ्या. भाजल्यामुळे ओट्स थोडे कुरकुरीत होतील.

– गूळ किसून घ्या. स्टोअरमधील तयार गूळ पावडर मिळते. ती सुद्धा तुम्ही वापरू शकता.

– काजू आणि बदाम देखील भाजून घ्यावेत. त्यानंतर ते बारीक कापून घ्या.

– एका भांड्यात ओट्स, बदाम, वेलची पूड, काजू आणि शेंगदाणे एकत्र करा.

– एक चमचा तूप गरम करा आणि तूप गरम झाले की त्यात गूळ टाका. गूळ व तूप ओट्सच्या मिश्रणात घाला.

– आवश्यक असेल तितके तूप गरम करा व हळूहळू मिश्रणात टाका.

– सर्व मिश्रण एकजीव करा व त्याचे लाडू वळा.

आपली प्रतिक्रिया द्या