कला-साहित्यातून स्त्री शक्तीचा जागर, पु. ल. देशपांडे कला अकादमीत महिला कला महोत्सव

‘महिला दिनाचे औचित्य साधून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने महिला कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सव 12 मार्चपर्यंत सुरू राहील. महिला कला महोत्सवात महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे एकूण 24 कार्यक्रम सादर होणार आहेत.

या कला महोत्सवाची सुरुवात मीना नाईक यांच्या पॉक्सो कायद्यावर आधारित ‘अभया’ एकपात्री नाटकाच्या प्रयोगापासून सुरुवात झाली. प्रयोगाला निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि अभिनेता सचिन खेडेकर यांची विशेष उपस्थिती होती. शिल्पी सैनी यांच्या कथ्थक नृत्याचा ‘नृत्यार्धना’ हा नृत्याविष्कार सादर झाला तर कलांगणात शाहीर मीराताई उमप, संध्या सखी, विमल माळी यांनी ‘जागर महिला लोककलेचा’ या भारुडावर आधारित कार्यक्रमातून लोककलेतील स्त्र्ााr साहित्याविषयी जनजागृती केली. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवार, 11 मार्च
–  दुपारी 2 वाजता, नात्याची गोष्ट
(दोन अंकी नाटक)
–  सायंकाळी 4.30 वाजता, विविधाः ऍन अनकॉमन वुमन (दिशा देसाई यांचे कथ्थक सादरीकरण)
– सायंकाळी 5 वाजता, आर्ट ऑफ सायलेन्स (अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावर आधारित मूकनाटय़)
–  सायंकाळी 5.15 वाजता, चित्रकथी, सादरकर्ते अभिषेक दुखंडे
–  सायंकाळी 6.30 वाजता,
ओटीटी आणि ती, सादरकर्ते मेघना एरंडे आणि टीम
– रात्री 8 वाजता, ‘सांज उन्हाच्या चार पाकळ्या’. स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक प्रहरातील भावछटा मराठी भावगीतांतून उलगडणारा कार्यक्रम

शनिवार, 12 मार्च
– दुपारी 12 वाजता, बाई समजून घेताना (अभिवाचन नाट्य प्रयोग, सादरकर्ते सुधीर चित्ते)
–  दुपारी 12 वाजता, वासूची सासू
– सायंकाळी 5 वाजता, रामरतन धन लता मंगेशकर, सादरकर्ते शुभदा वराडकर आणि टीम
– सायंकाळी 5.15 वाजता, राधारंग, सादरकर्ते लोकरंग सांस्कृतिक रंगमंच, सुखदा खांडगे, तेजश्री सावंत, प्रमिला लोडंगेकर
–  सायंकाळी 6.30 वाजता,
लता- कल भी, आज भी
सादरकर्ते कोकण कन्या बँड
– रात्री 8 वाजता, संगीत बारी, सादरकर्ते भूषण कोरगावकर, राजहंस प्रकाशन,
स्थळ: रवींद्र नाट्य मंदिर कलांगण, मिनी थिएटर

मकरंद देशपांडे सांगतायत, ‘सर, प्रेमाचं काय करायचं?’

कला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या ‘सर, प्रेमाचं काय करायचं?’ या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल झाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भोवती फिरणारे कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे, आकांशा गाडे, निनाद लिमये, माधुरी गवळी आणि अजय कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे. कला महोत्सवात महिला प्रेक्षकांची संख्या ही उल्लेखनीय होती. तसेच ‘सर प्रेमाचं काय करायचं?’ या नाटकाला प्रेक्षकांनी लावलेली हजेरी ही विशेष उल्लेखनीय होती. नाटकाच्या या महिला दिन विशेष प्रयोगाला प्रेक्षकांनी उभे राहून 5 मिनिटे टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली.

 महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘मुक्ताईची मुक्त गाथा’ संत साहित्याच्या अभ्यासक प्राची गडकरी यांनी सादर केली. ‘बे एके बे’ कवितेच्या माध्यमातून पुरुषांनी महिलांनी सलाम केला. विनोद गायकर, डॉ. गजानन मिटके, निखिल राणे, अमोल मटकर या नावाजलेल्या कलाकारांनी हा आगळावेगळा कार्यक्रम केला. ‘पालकी- सांगीतिक मेजकानी’ हा आठ स्त्र्ायांनी एकत्र येऊन हा बँड निर्माण केला असून ‘पालकी’ च्या माध्यमातून या कलाकारांनी, एका स्त्रीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रकास संगीतमय पद्धतीने मांडला आहे. न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या लावणीने मनं जिंकली.