रस्त्यातच झाला आजारी पत्नीचा मृत्यू, पाठिवर मृतदेह घेऊन केला पायी एवढा किमी प्रवास

आंध्रप्रदेशात एक काळीज हेलावणारी घटना घडली आहे. आजारी पत्नीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याने पाठिवर मृतदेह घेऊन ती व्यक्ती 80 किमी पायी चालत होती. मात्र जेव्हा पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला त्यावेळी त्यांनी एका रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह घरी पोहोचवला. सध्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सामुल पांगी असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांगी यांनी आपल्या आजारी पत्नीला आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील सांगीवलसाच्या एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे त्यांच्या पत्नीवर उपचाराचा काहीच परिणाम दिसत नव्हता. डॉक्टरांनी घरीच सेवा करायला सांगितली.  त्यामुळे तो पुन्हा 100 किमी दूर त्याच्या घरी परतण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या गावी परतण्यासाठी एक रिक्षा भाड्याने घेतली, मात्र विजयनगरम येथे आल्यावर त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, त्यावेळी त्या रिक्षावाल्याने पुढे रिक्षा नेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना चैल्लुरु रिंग रोडवर उतरवले. मात्र त्यावेळी दुसरा कोणता रस्ता दिसला नाही, त्यामुळे पांगी पायीच पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून चालू लागला. तिथून 80किमी घर दूर होते. काही लोकांनी त्यांना मृतदेह घेऊन जाताना पाहिले आणि पोलिसांना त्याबाबत माहिती दिुली. त्यानंतर पोलीस टीवी तिरुपती राव आणि गणत्यादा सब इन्स्पेक्टर किरण कुमार यांनी त्याची चौकशी केली.

सुरुवातीला भाषेच्या समस्येमुळे पांगी नेमके काय बोलतोय ते कोणालाच काही कळत नव्हते. पण सगळ्यात आधी त्यांनी रुग्णवाहिका मागवली आणि पत्नीचा मृतदेह गावाला घेऊन आले. जिथे पांगीने पोलिसांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानले.