कोरोना पॉझिटिव्ह महिलेची युवकाने काढली छेड; आरोपी नजरकैदेत

देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच ओडिशा मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ओडिशा मधील नुआपाडा जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची एका युवकाने छेड काढल्याची घटना घडली आहे. महिलेने आरोपी युवक छेड काढत असल्याचा संशय आल्यावर जोरात आरोडाओरड केली. कोरोना चाचणी सकारात्मक आल्यावर महिला 26 एप्रिलला दवाखान्यात उपचार घेण्यासाठी भरती झाली होती. आरोपी युवकाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, रूग्णालयात कोरोनावर उपचार घेण्यासाठी 23 एप्रिलला दाखल झाला होता.

ही घटना नुआपाडा जिल्ह्यातील शिलडा येथील कोविड रुग्णालयात घडली. मिळालेल्या माहितीनुसार महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला आरोपीने स्पर्श केल्यानंतर जोरात आरडाओरड केली, तेव्हा कोरोनावर उपचार घेणारे रुग्ण जमा झाले.

नुआपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजुक्ता बारले यांनी आजतक वृत्तवाहिनीला महिलेची छेडछाड झाल्याची माहिती दिली. महिलेने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी आयपीसी च्या कलम 354 आणि 354(अ), 269, 270 नुसार आरोपी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बारला यांनी सांगितले की, आरोपी विरूद्ध कारवाई केली जाईल, पण सध्या आरोपी कोरोनाग्रस्त आहे. आरोपीची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात येईल, आरोपीला शिलडा येथील रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपीवर लक्ष ठेवून आहेत.

तसेच महिला तहसीलदाराने पीडीत महिलेची भेट घेऊन पीडित महिलेचे जबाब नोंदवून घेतले. पीडित महिलेने म्हटले की, आरोपीने मला स्पर्श केला त्याची नियत मला चांगली वाटली नाही. मी लगेच आरडाओरडा केला आणि दुसऱ्या रुग्णांना बोलावले.

आपली प्रतिक्रिया द्या