राहुल गांधींचे निकटवर्तीय रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

77

सामना ऑनलाईन, पुणे

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसमध्ये आणि खासकरून पुण्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोकमान्य टिळकांचे वारस असलेले हे कुटुंब अत्यंत सुसंस्कृत मानले जाते, त्याच कुटुंबातील रोहित टिळकांवर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याने विशेष आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पिडीत महिलेने आरोप केला होता की लग्नाचे आमीष दाखवून रोहित टिळक यांनी तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

विश्रामबाग पोलिसांकडे तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी टिळक यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी देखील या महिलेने टिळक यांच्यावर आरोप केले होते. या महिलेने टिळक यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा आणि पत्रकार परिषद घेण्याचा इशारा दिला होता. मात्र तिने त्यापैकी काहीच केलं नाही. त्यामुळे या महिलेवर कोणाचा तरी दबाव असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. हे प्रकरण आता पोलिसांकडे आल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे, तपासानंतरच कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे स्पष्ट होईल.

२०१५ ते २०१७ दरम्यान रोहित टिळक यांनी वेळोवेळी आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा पिडीत महिलेने आरोप केला आहे. या महिलेने पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची देखील भेट घेतली होती. आपल्यासोबत अनैसर्गिक बलात्कार आणि मारहाण झाल्याचंही या पिडीती महिलेने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या