पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा

सामना ऑनलाईन, नगर

नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मंत्र्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणाऱ्या एका सुरक्षारक्षकाविरूद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गणेश अकोलकर असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो विवाहीत आहे. विवाहीत असूनही त्याने ही ओळख लपवत एका महाविद्यालयातील तरूणीला लग्नाचं आमीष दाखवलं. हे आमीष दाखवत त्याने या तरूणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. या संबंधातून तरूणी गर्भवती राहीली. या तरूणीचा गणेश अकोलकरने गर्भपात करायला लावला. यानंतर तरूणीने त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावल्यानंतरही त्याने तिच्यासोबत पुन्हा शारीरीक संबंध ठेवले. यानंतरही तरूणीने लग्नासाठीही हट्ट सोडला नाही, त्यामुळे आपल्याला गणेशची बायको, भाऊ आणि भावाची बायको यांनी मारहाण केल्याचा आरोप या तरूणीने केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलो असता तक्रार करू नये यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचंही या तरूणीचं म्हणणं आहे. अखेर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून गणेशविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मात्र अजूनही गणेशला अटक झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या