धडक कारवाई करणार्‍या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचार्‍यांचा पालकमंत्र्याकडून गौरव

432

नगर जिल्हयामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु तसेच वाहतूक करणार्‍यांवर बडगा उगारुन 4248 गुन्हे दाखल करुन 4 कोटी 76 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या विभागाच्या कामगिरीबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे अनिल पाटील, दशरथ लक्ष्मण जगताप, संजय मार्तंड सराफ, अण्णासाहेब बनकर, नारायण ठुबे यांची पुरस्कारासाठी निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन राज्य उत्पादन शुल्क पुण्याचे विभागयीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, नगरचे उपअधिक्षक पराग नवलकर, नगरचे अधिकारी सी.पी.निकम यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासनाचे सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय हे या विभागाचे ब्रिद वाक्य आहे. मद्य विक्रीतून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल गोठा करुन देण्यासाठी हा विभाग कार्यरत असतो. तसेच अवैध मद्य विक्री, वाहतूक, साठा व नियंत्रण ठेवण्यासाठी हा विभाग काम करत असतो. 2019 या आर्थिक वर्षात एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत या विभागाने 1248 गुन्हे दाखल करुन यामध्ये 1013 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 179 वाहनांचा समावेश असून एकूण जप्त केलेला मुद्देमालाची किंमत 4 कोटी 76 लाख रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या