दोन तासात झाला न्याय, भ्रष्ट अधिकारी शेळके बडतर्फ

45

सामना प्रतिनिधी । बीड

बीडचे जिल्हापुरवठा अधिकारी एन आर शेळके यांचा भ्रष्टचारी चेहरा समोर आला आणि अवघ्या दोन तासात अक्षरशः उध्वस्त झाले. बारा वाजता एक लाख रुपयांची लाच घेतांना त्यांना रंगेहात पकडून जेरबंद करण्यात आलं आणि दुपारी एक वाजता जुन्या अपहाराच्या प्रकरणात चौकशी पूर्ण करून दोषी शेळकेना सह सचिवांच्या पत्रानुसार बडतर्फ करण्यात आलं.

बीडचे जिल्हापूरवठा अधिकारी एन आर शेळके यांना लाख रुपयांची लाच घेतांना जेरबंद केल्यानंतर तासाभरात दुसरा दणका बसला. संभाजीनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी असताना केलेल्या अपहाराची विभागीय चौकशी सुरू होती, महसूलचे विभागीय उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी चौकशी पूर्ण केली यात एन आर शेळके दोषी आढळून आले त्यांनी हा अहवाल राज्याचे सहसचिव यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर अपहाराच्या त्या प्रकरणात एन आर शेळके यांना सहसचिव गुट्टे यांच्या स्वाक्षरीने आज सेवेतून बडतर्फ करण्यात आले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी झाली, या दोन घटनांनी भ्रष्ट्राचार करणारे शेळके सारखे अधिकारी सेवेतून कायम मुक्त झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या