‘ओखी’ चक्रीवादळाचा पोलीस प्रशासनाला तडाखा

37

अमित खोत । मालवण

मालवण बंदरातील पोलिसांच्या सिंधू ५ स्पीड बोट आणि गस्ती नौकेला रात्री लाटांच्या तडाख्यात जलसमाधी मिळाली. सुदैवाने या गस्ती नौकेतील दोन कर्मचारी बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र गस्ती नौका बुडाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. बंदरात उभ्या असलेल्या दुसऱ्या गस्ती नौकेला किनाऱ्यावर घेण्यासाठी पोलीस यंत्रणेची कार्यवाही सुरु होती.

दरम्यान मासेमारी व पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. सर्व बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत. समुद्रात घोंगावणाऱ्या वादळामुळे किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव व ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. मध्यरात्री देवबाग, आचरा, तळाशील अनेक ठिकाणी बंधारा ओलांडून पाणी वस्ती परिसरात घुसले होते. देवबाग मोंडकर वाडी येथील संजय मोंडकर यांच्या पर्यटक असलेल्या निवास रूममधे समुद्राच्या उधनाचे पाणी घुसल्याने ४ पर्यटकांना मध्यरात्री अन्य हॉटेल मध्ये हलवण्यात आले.

सिंधुदुर्गसह अन्य किनारपट्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजही मोठ्या उधाणाची व मोठ्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या