‘ही’ स्कूटर देते फक्त 20 पैशात 1 किलोमीटरचा मायलेज  

6774
Okinawa PraisePro Electric Scooter हिंदुस्थानात सादर झाली आहे. कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 71,990 हजार रुपये इतकी ठेवली आहे. PraisePro ही इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशामध्ये 1 किलोमीटरपर्यंत मायलेज देणार, असा दावा कंपनीने केला आहे. केंद्र सरकार हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. अलीकडेच सरकारने हिंदुस्थानातील इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटीत कपात करून 5 टक्के केला आहे. आज आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कुटरच्या काही खास फीचर्स बद्दल सांगणार आहोत.
परफॉर्मन्स – Okinawa PraisePro Electric Scooter मध्ये ब्रशलेस, वॉटरप्रूफ 1 kW (rated)/2.5 kW DC मोटर देण्यात आली आहे. यामध्ये पॉवरसाठी 2 kWh लिथियम-आयन डिटेचेबल बॅटरी देण्यात आली आहे.
चार्जिंग – ही स्कुटर तीन तासात संपूर्ण चार्ज होते.
ड्रायव्हिंग मोड – Okinawa PraisePro मध्ये उत्तम रायडींग एक्सपिरियंस करता तीन रायडिंग मोड देण्यात आले आहे.
  • Economy मोडवर आपल्याला ताशी 30 ते 35 किमी इतका टॉप स्पीड मिळेल.
  • Sport मोडवर ताशी 50 ते 60 किमी इतका टॉप स्पीड मिळेल.
  • Turbo मोडवर आपल्याला ताशी 65 ते 70 किमी इतका टॉप स्पीड मिळेल.

मायलेज 
  • Okinawa PraisePro च्या Economy मोडवर 110 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल.
  • Sport मोडवर 88 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल.
  • Turbo मोडवर किती मायलेज मिळेल हे अद्याप कळू शकले नाही आहे.
आपली प्रतिक्रिया द्या