ओला कॅबमध्ये झाला मुलाचा जन्म; ५ वर्षांपर्यंत विनामूल्य सेवा

42

सामना ऑनलाईन | पुणे

२ ऑक्टोबरला पुण्यात एका महिलेने मुलाला ओला कॅबमध्येच जन्म दिला. या दोघांना कंपनीने ५ वर्षांपर्यंत विनामूल्य सेवा देण्याचे सांगितले आहे. पुणे येथे सकाळी ८ वाजता ओला चालक यशवंत गलांडे, गर्भवती महिला ईश्वरी देवी हिला कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आला होता. पण, रस्त्यातच महिलेला वेदना सुरु झाल्या आणि काही वेळात कॅबमध्येच मुलाचा जन्म झाला.

ओला चालकाने नवजात बाळाला आणि त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. ईश्वरी देवी या महिलेच्या कुटुंबियांनी ओला चालकाचे आभार मानले आहेत. चालकाने केलेल्या या मदतीबद्दल ओला कंपनीने त्याचे कौतुक केले आहे. आणि ईश्वरी देवी हिला ५ वर्षांसाठी मोफत राइडची ऑफर दिली.

आपली प्रतिक्रिया द्या