…म्हणून ती 19 वर्षांपासून राहतेय सार्वजनिक शौचालयात!

1002

सार्वजनिक शौचालय आणि घर? कसं शक्य आहे. असा विचारही आपण करू शकत नाही. पण, तामीळनाडूच्या मदुराई भागातली एक वृद्ध महिला गेली 19 वर्षं सार्वजनिक शौचालयातच राहत आहे. यामागचं कारण जाणून घेतलंत तर तुमच्या काळजाला घरं पडल्याशिवाय राहणार नाहीत.

करुपाई असं या वृद्ध महिलेचं नाव असून त्या 65 वर्षांच्या आहेत. गेली 19 वर्षं त्या मदुराई येथील रामनद भागातल्या सार्वजनिक शौचालयातच राहतात. शौचालयाची सफाई करून त्यांना दिवसाकाठी 70 ते 80 रुपये मिळतात. त्यांच्याकडे उत्पन्नाचं अन्य कोणतंही साधन नसल्याने नाईलाजाने त्यांनी ही नोकरी स्वीकारली आहे. त्यांच्याकडे घरही नाही, म्हणून त्या तिथेच राहतात. त्यांची एक मुलगीही आहे, मात्र ती त्यांना कधीच भेटायला येत नाही.

करुप्पाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या निवृत्तीवेतनाकरिता अर्जही केले. पण, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर करुपाई यांचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या