चायनीजची गाडी लावण्यास केलेली मनाई वृद्धाला भोवली

1310

दुकानासमोर चायनीजची गाडी लावण्यास मनाई केली म्हणून चायनीजवाल्याने वृद्ध दुकान मालकाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना अंधेरी पूर्वेकडे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विश्वास बोवन (31) याला अटक केली. अंधेरी पूर्वेकडील महाकाली केव्हज मार्गावर शिवकुमार शर्मा (60) यांच्या मालकीचे मनीष प्लायवूडचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर विश्वास चायनीजची गाडी लावायचा. त्यामुळे शर्मा यांनी दुकानासमोर चायनीज गाडी लावू नको असे विश्वासला बजावले होते. याचा राग मनात धरून विश्वासने शर्मा यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आपली प्रतिक्रिया द्या