धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने आजोबांनी गळा कापून केली आत्महत्या

536
murder-knife

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे एका जेष्ठ नागरिकाने गळा कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर (वय 60, रा. बाजार पेठ) असे या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहेत. काहींनी तर कोरोनाच्या भीतीने जीव गमवला आहे. तर अनेकजण व्यावसायिक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. दरम्यान, जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे सांगितले जात आहे. एक कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते. शुक्रवारी (दि 7) त्यांचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. त्रास कमी होत नसल्याने जुन्नरकर यांनी शुक्रवारी खोलीतील बाथरुममध्ये धारदार सुरीने व कात्रीने स्वःताचा गळा कापून आत्महत्या केली. सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर वडील बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी जुन्नरकर यांना मृत घोषित केले. खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या