जुनी-नवी फॅशन

सिद्धार्थ जाधव

 तुझी आवडती फॅशन…जिन्स, टीशर्ट आणि स्पोर्टशूज.

फॅशनची व्याख्या…फॅशन म्हणजे प्रेझेंटेबल असणे.

 फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…नाही, फॅशन म्हणजे तुमचं ऍटिटय़ूड, दृष्टिकोण. तुम्ही तो व्यवस्थित करणं महत्वाचं असतं. तुम्ही काहीही घातले तरी तुम्हाला ते सूट झाले पाहिजे.

आवडती हेअरस्टाईल?…वनसाईड भांग पाडून केस चांगले वाटतात.

फॅशन जुनी की नवी?…फॅशन फॅशन आहे. त्यात जुने-नवे काही नाही. जुने घाला किंवा नवीन घाला, तुम्हाला ते कॅरी करता आले पाहिजे.

आवडता रंग?…लाल

तुझ्या जवळच्यांना तुझी कोणती फॅशन आवडते…जीन्स-टीशर्टमध्ये आवडतो.

 स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…आधी करायचो. आता नाही करत.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतोस?…टीशर्टवर खूप खर्च करतो.

 ज्वेलरीमध्ये काय आवडते?…विशेष असे नाही. पण तृप्तीने दिलेला कडा हातात असतो.

आवडता ब्रॅण्ड…ठरावीक असा ब्रॅण्ड नाही. मला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करायला आवडतात.

 फॅशन फॉलो कशी करतोस?…फॅशन फॉलो नाही करत, मनाला जे पटेल जे आवडेल तेच कपडे घालतो. शूज खूप आहेत. त्यावर कॉम्बिनेशन करुन कपडे घालतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…अपडेटची गरज लागत नाही. अंकिता देशमुख ही माझ्यासाठी कपडे डिझाईन करते.

ब्युटी सिक्रेट…आतून तुम्ही स्वच्छ आनंदी राहिलात तर बाहेर चमकदारपणा येतो.

टॅटू काढायला आवडेल का?…काढायचा आहे, मला माझ्या आईचे, मुलींचे आणि बायकोचे नाव काढायचे आहे. पण कधी काढेन हे माहीत नाही.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…गॉगल, परफ्युम आणि मोबाईल चार्जर.

फिटनेससाठीसगळ्यात आधी मी निर्व्यसनी आहे हाच माझा फिटनेस फंडा आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने व्यायामासाठी वेळ मिळत नाही, पण योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करतो.