संपावरील 15 हजार कर्मचाऱ्यांना व्हॉट्सऍपद्वारे नोटिसा, कामावर हजर न झाल्यास नगर जिल्हा प्रशासन बजावणार शो-कॉज

जुन्या पेन्शनसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जिल्हा परिषद आणि महसूलच्या 15 हजारांहून अधिक कर्मचाऱयांना व्हॉट्सऍपद्वारे कामावर हजर होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, या नोटिसांमुळे महसूल कर्मचाऱयांमध्ये तीव्र नाराजी असून, कर्मचाऱयांनी काळे कपडे घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

व्हॉट्सऍप आणि ऑफलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या 14 हजार 194, तर महसूल विभागाच्या 950 कर्मचाऱयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यांसह गैरहजर असणाऱया सर्व शासकीय कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. 721 माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोलापुरात जिल्हाधिकाऱयांनी घेतली तातडीची बैठक

सोलापूर ः संपामुळे सोलापूर शहर क जिह्यातील आरोग्य यंत्रणाही केठीस धरली गेल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेकाईकांचे अतोनात हाल होत आहेत, तर दुसरीकडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने शाळांकर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीकर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रमुख अधिकाऱयांची बैठक घेतली. याकेळी आरोग्य किभाग, शिक्षण किभाग आणि पाणीपुरकठा किभाग या तिन्ही किभागप्रमुखांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरकठा याबाबत सातत्याने पाठपुराका करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडाक्यात, सोलापुरातदेखील कोरोनाची रुग्णसंख्या काढत आहे, त्यामुळे आरोग्य किभागानेही कर्मचारी संपात असले तरी नागरिकांच्या आरोग्याकर कोणताही परिणाम होऊ नये, याची दक्षता घ्याकी, अशा सूचना केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

सांगली मनपाचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले असताना सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवा बजावणारा एकही कर्मचारी संपामध्ये सहभागी झाला नसून सर्व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपली सेवा नियमितपणे बजावत आहेत. याबाबत मनपा आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी या अत्यावश्यक सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांना विश्वासात घेऊन समन्वयाने आपले काम सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या कर्तव्यावर सेवा बजावत आहेत. आरोग्य कर्मचारी 244, पाणीपुरवठा कर्मचारी 67, अग्निशमन कर्मचारी 15, जलनिस्सारण विभाग 67, जलशुद्धीकरण विभाग 17 आणि सफाई कर्मचारी 615 असे सर्व विभागांचे अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी आपल्या कामावर उपस्थित राहून आपली सेवा बजावत आहेत.