नॅशनल हेराल्ड प्रकरण; जुन्या टॅक्स फायली पुन्हा उघडणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस पक्षाला नॅशनल हेरॉल्ड खटल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. 2011-12 चे करनिर्धारण पुन्हा एकदा करण्याच्या निर्णयाला यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. करासंबंधी कार्यवाही करण्याचा आयकर विभागाला अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आपल्या तक्रारीबाबत आयकर विभागाशी संपर्क साधायला हवा. कारण करनिर्धारणाच्या फाइल्स पुन्हा उघडण्याच्या आयकर खात्याच्या अधिकाराला कुणी आव्हान देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सोमवारी हिंदुस्थान बंद पुकारला होता. नेमके त्याचवेळी न्यायालयाचा हा निकाल आला आहे.

summary- old tax files to be open in national herald case