गोड बोलून जेष्ठ महिलेचे दागिने केले लंपास

मुलीकडे जाण्यासाठी निघालेल्या जेष्ठ महिलेला गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करत दोन चोरट्यांनी 60 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 4 ऑगस्टला कात्रज चौकात घडली आहे. याप्रकरणी माधवी धुमाळ (वय 59, रा. भिलारवाडी ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिला 4 ऑगस्टला मुलीकडे जाण्यासाठी कात्रज बसस्थानकात वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यांच्याकडील गंठण आणि अंगठी असा 60 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. त्यानंतर त्याबदल्यात खोटी सोन्याची चीप देत फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे. डी. घावटे तपास करीत आहेत.