नेमबाज ओम कुबलला रौप्यपदक

140

सामना ऑनलाईन । मुंबई

दिल्लीत भरविल्या गेलेल्या यंदाच्या १२व्या सरदार सज्जनसिंग राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत ओम कुबल यांने रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा देशातील अव्वल ३० खेळाडूंमध्ये खेळवली जाते. यात अंतिम स्पर्धेत ८ पैकी महाराष्ट्राच्या २ खेळाडूंना गुणांकनाने स्थान पटकवता आले. ओम कुबल आठव्या क्रमांकावर असूनही आसामच्या हृदय हजारीकाशी त्याने दिलेली कडवी झुंज प्रेक्षणीय ठरली. अंतिम आठ खेळाडूंमध्ये हिंदुस्थानी लष्कर, हवाई दल तथा हरयाणातील ऑलिम्पिक तथा राष्ट्रकुल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंचा वरचष्मा होता.

अंतिम नेमबाजीतील अटीतटीच्या मुकाबल्यात तो शेवटच्या शॉटला ०.५ गुणांनी मागे पडल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कास्य पदक लष्कराच्या सत्येंद्र सिंग याने पटकावले. या विजयाचे श्रेय ओमने त्याचे प्रशिक्षक विश्वजीत शिंदे, प्रसाद हेळकर व सावरकर रायफल शूटिंग क्लबला दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या