मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला 18 महिन्यांपर्यंत राहू शकतात नजरकैदेत

1529


जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना त्यांच्याच घरात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यात पीडीपी अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना देखील गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले आहे. या नेत्यांना जवळपास 18 महिन्यांपर्यंत त्यांच्या घरात स्थानबद्ध करण्यात येऊ शकते असे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी तसे संकेतच दिले आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या नेत्यांबाबत जितेंद्र सिंह यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘जम्मू कश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेले नेते हे हाऊस अरेस्ट मध्ये नाही तर त्यांना पाहुण्यासारखी वागणूक दिली जात आहे. त्यांनी सर्व सोयीसुविधा दिल्या जात आहेत. ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्ध ठेवण्यात येणार नाही’.

आपली प्रतिक्रिया द्या