विरोध डावलून सरसंघचालकांचे केरळमध्ये ध्वजारोहण

28

सामना ऑनलाईन,  पल्लकड (केरळ)

केरळमध्ये पल्लकडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका शाळेत ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला; मात्र शाळा प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे भागवत यांनी विरोध डावलून ध्वजारोहण केले आहे. सरकारी शाळेमध्ये एखाद्या राजकीय नेत्याच्या हस्ते ध्वजारोहण करणे योग्य नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी पी. मारीकुट्टी यांनी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहणास विरोध केला होता.

शाळेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे वर्षभरापूर्वीच निश्चित झाले होते असे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले. अखेर शाळेकडून भागवत यांच्या हस्तेच ध्वाजारोहण करण्याचे निश्चित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या