
22 डिसेंबर 2017 या दिवशी भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा शुभारंभ झाला. सहावर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि नाट्यरसिकांच्या प्रेमप्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळीची’ नाट्यदिंडी विसावणार आहे. बुधवार 22 नोव्हेंबर, संध्याकाळी 6.30 वाजता शीव येथील षण्मुखानंद सभागृहात शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
‘देवबाभळी’ नाटकाने सर्वाधिक 44 पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता 500 व्या प्रयोगा पर्यंत येऊन पोहोचली. आता नाटक निरोप घेणार असल्याने ते पाहण्याची अखेरची संधी मिळणार आहे.