मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर (LTT) कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक वर्षांचे बाळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बाळाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 4.15 च्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवरील गेट क्रमांक तीनवर एक महिला बाळाला सोडून गेली. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रेल्वे पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ बाळाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केल आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे.