नामांकित कंपनीच्या लोगाचा गैरवापर केल्याप्रकरणी एकाला अटक

देशातील एका नामांकित कंपनीच्या  लोगोचा बनावटरित्या वापर करून तयार केलेल्या मालाची साठवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   याप्रकरणी किरण राजेंद्र कोंडावार (वय.55,रा. आंबेगाव) याला अटक करण्यात आली आहे. तर खेताराम कलाराम देवासी (वय 45), जेठाराम रामलाल सोलंकी (रा. मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.  कंपनीच्यावतीने  36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

नांमांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने माल बाळगून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  आरोपी किरण कोंडावार याने  बनावट लोगोचा वापर करून तयार केलेला माल ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशान  बाळगला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याशिवाय  मार्केटयार्ड येथील देवासी व सोलंकी दोघांना 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा बनावट माल जवळ बाळगला होता. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पोलिस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या