गेवराईतील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; कोरोनाने 15 जणांचा बळी

389

बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अत्यवस्थ असलेली गेवराई येथील महिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात 18 जूलै रोजी दाखल झाली होती. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. सोमवारी आलेल्या अहवालामध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्या महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून गेवराई शहरात गेल्या दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

गेवराई शहरातील माळी गल्ली येथील एका 32 वर्षीय महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला कोरोनाची लक्षणे असल्याने तिचा स्वॅब घेवून जिल्हा रूग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये नेण्यात आले होते. सोमवारी सकाळी आलेल्या 24 कोरोना पॉझिटिव्ह अहवालांमध्ये त्या 32 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 13 जणांचा तर जिल्हाबाहेरील दोघांचा अशा 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या