वन डे पाठोपाठ हिंदुस्थानी महिलांची विंडीजवर टी-20 मालिकेतही सरशी

339
फोटो सौजन्य - बीसीसीआय

तिसऱया लढतीसह मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी

हिंदुस्थानी फिरकीपटूंच्या अफलातून कामगिरीमुळे वेस्ट इंडीज महिला संघाचा डाव 20 षटकांत 59 धावांतच गडगडला. त्यानंतर मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जच्या 51 चेंडूंतील नाबाद 40 धावांच्या खेळीमुळे हिंदुस्थानच्या महिला संघाने यजमान विंडीजवर 20 चेंडू आणि 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयाने वन डे मालिकेपाठोपाठ टी -20 मालिकेतही हिंदुस्थानने पाच लढतींच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

हिंदुस्थानच्या वतीने फिरकीपटू राधा यादव (6 धावांत 2 विकेट), दीप्ती शर्मा (12 धावांत 2), पूनम यादव (8 धावांत 1) आणि अनुजा पाटील (13 धावांत 1) यांनी यजमान विंडीजचा डाव 20 षटकांत 9 बाद 59 या धावसंख्येवर गुंडाळला. पाहुण्या हिंदुस्थानचा हा सलग दुसरा मालिका विजय आहे, तर वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय टी -20तला सलग सहावा पराभव आहे. हिंदुस्थानने या आधी दक्षिण आफ्रिकेला मालिका पराभवाचे पाणी पाजले आहे.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या यजमान विंडीज संघाचा डाव फक्त 59 धावांतच गडगडला. यजमानाच्या आघाडीच्या फलंदाज हेली मॅथ्यूज (7), स्टेसी एन किंग (7) आणि  शेमाइन कैंपबेल (2) या पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांत केवळ 12 धावांच नोंदवू शकल्या. विंडीजच्या वतीने चीडन नेशन (11) आणि  चिनेली हेनरी (11) या दोघीच दोन अंकी संख्या गाठू शकल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या