बीड जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंबाजोगाई तालुक्यातील साकुडमध्ये हा रुग्ण सापडला असून या गावाचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे.
पंढरपूरवरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू उपचार सुरू असतानाच 17 जुलै रोजी झाला होता. परंतु, लक्षणे पाहता येथील डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा 1 ऑगस्ट रोजी बीडच्या आरोग्य विभागाला रिपोर्ट मिळाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. अंबाजोगाई तालुक्यातील साकुड गावात आरोग्य कर्मचार्यांकडून सर्वेक्षण करत कोणाला लक्षणे आहेत का? याची माहिती घेतली जात आहे.