रत्नागिरीत ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

 

रत्नागिरी शहरातील परटवणे येथे रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. मासळीची वाहतूक करणाऱ्या ट्रकची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा तरुण साखरतर येथील असल्याचे समजत असून, तो रत्नागिरीहून साखरतरला जात असताना, समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र या तरुणाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

या अपघातामुळे साखरतर येथील नागरिक आक्रमक झाले. त्वरित कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यवाही सुरू केली.