चोरवणे येथे अपघात,एक ठार चार जखमी

सामना ऑनलाईन,रत्नागिरी

फोर्ड फियास्को गाडीचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा जाऊन गाडी झाडावर आदळली. हा अपघात मंगळवारी दुपारी चोरवणे येथे झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून चारजण जखमी झाले आहेत.

फोर्ड फियास्को एम एच ०३ एजी ११०३ या गाडीचा टायर फुटून हा अपघात झाला. या अपघातामध्ये राहूल तुकाराम फारणे यांचा मृत्यू झाला आहे. गाडीतील दिलीप साळुंखे, संजय चव्हाण सचिन पाटील, विजय बंडगर, सर्व रा.सांगली हे जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या