नागपूर मेट्रोचा पहिला बळी, अजस्त्र गर्डर नेताना अपघात, १ ठार

महेश उपदेव । नागपूर

नागपूर मेट्रोचा अजस्त्र गर्डर नेत असताना अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वर्धा रोडवरील प्राईड हॉटेलसमोर हा भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक खाली येऊन वैभव गडेकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी खापरीतील कास्टिंग यार्डमधून गर्डर्स आणले जात होते. आयएलएफएस कंपनीच्या ट्रकमधून गर्डर्सची वाहतूक सुरू होती. सोमवारी पहाटे वैभव गडेकर हा तरुण गर्डर्स वाहून नेणाऱ्या ट्रक खाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजस्त्र गर्डर्सची वाहतूक सुरू असताना योग्य ती काळजी का घेतली जात नाही असा नागरिकांकडून केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या