प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांची एकमेकांवर बॉम्ब फेक

फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील प्रचारापासून सुरू झालेला हिंसाचार निकाल लागून महिना होत आला तरी अद्याप थांबलेला नाही. 24 परगाणा जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा भाजप-तृणमूल कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर गावठी बॉम्ब फेकले. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे.

24 परगानातील भाटपाडा येथील पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या वेळी श्रेयवादावरून भाजप व तृणमूलचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यानंतर या दोन्ही गटांत हाणामारी झाली. या हाणामारीच्या वेळी गावठी बॉम्बही फेकण्यात आले. हिंसाचाराच्या वेळी पोलिसांना कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.