जळगाव जिह्यात अपघाताच्या घटना काही कमी होत नाहीत. चाळीसगाव तालुक्यातील रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 2 जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर हरी बच्छे (27, रा. सायगाव बगळी, ता. चाळीसगाव) असे अपघातातील तरुणाचे नाव आहे. जिह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी येथील ज्ञानेश्वर हरी बच्छे हा युवक भजनी मंडळामध्ये वादक म्हणून कामाला होता.
ज्ञानेश्वर यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले होते. सायगाव येथे घरी परतल्यावर त्यांना पुन्हा मूत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे रुग्णवाहिकेने नेत असताना कळवाडी फाट्याजवळ एर्टिगा कारला धडक दिली.