दीड लाख शेतकऱयांच्या कर्ज खात्यांवर आजपासून पैसे जमा होणार!

4270

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत ही योजना प्रत्यक्षात आली आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरातच 21 लाख 82 हजार शेतकऱयांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. आतापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱयांच्या खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. या शेतकऱयांच्या बँक खात्यांत सोमवारपासून पैसे जमा होणार आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील 36 लाख 45 हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर 34 लाख 98 हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या 21 लाख 82 हजार इतकी आहे. सरकारने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील 15 जिह्यांची पूर्णतः यादी तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे 13 जिल्ह्यात अंशतः यादी जाहीर करण्यात आली आहे.

1 लाख 25 हजार खात्यांत पैसे जमा होणार
यादी जाहीर झालेल्या शेतकऱयांच्या कर्ज खात्यांचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 1 लाख 25 हजार खात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. प्रमाणीकरणानंतर शेतकऱयांच्या कर्जखात्यांवर व्यापारी बँका 24 तासांत तर जिल्हा मध्यवर्ती बँका 72 तासांत रक्कम जमा करतात. रविवारी सुट्टी असल्यामुळे उद्या सोमवारपासून प्रमाणीकरण झालेल्या बँक खात्यांत पैसे जमा होतील.

आपली प्रतिक्रिया द्या