अबब … एक लाखाचा स्मार्ट फोन!

29

विद्युतरोधक, जलावरोधी आणि ओरखडेरहित असलेला दमदार स्मार्टफोन ‘पॅनासॉनिक’ कंपनीने हिंदुस्थानात आज  लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत ९९ हजार रुपये इतकी असून हिंदुस्थानातील आतापर्यंतचा हा सर्वात महागडा स्मार्टफोन ठरला आहे. पॅनासॉनिक टफपॅड ‘एफजेड एफ १’ आणि ‘एफजेड एन १’ हे दोन स्मार्टफोन असून त्यांची किंमत अनुक्रमे ९९ हजार व १ लाख ९ हजार रुपये इतकी आहे; तर ‘एफजेड ए २’ या टॅबलेटची किंमत १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. एफजेड एफ १ आणि एफजेड एन १ या स्मार्टफोनचे फिचर जवळपास सारखेच असून एफजेड एफ १ विंडोज १०आयओटी या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि एफजेड एन १ हा स्मार्टफोन ऍण्ड्रॉईड लॉलीपॉप ५.१.१ या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्ट फोनमध्ये २.३ गीगाहर्टस्ची ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन  ८०१ ही चिपसेट बसविण्यात आली आहे, तर २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्ट फोनना 8मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा  फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या