अमेरिकेत हिंदुस्थानी महिलेची मुलासह निर्घृण हत्या

सामना ऑनलाईन । न्यूजर्सी

अमेरिकेत एका हिंदुस्थानी महिलेसह तिच्या मुलाची हत्या करण्यात आली. एन. शशिकला (४०) आणि त्यांचा मुलगा अनिश साई (७) अशी या हत्येत बळी पडलेल्या मायलेकांची नावं आहेत. न्यूजर्सीमधल्या राहत्या घरी त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे.

शशिकला यांचे पती एन. हनुमंत राव ऑफिसातून घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीला आली. हनुमंत आणि शशिकला हे दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत. शशिकला घरी राहूनच काम करायच्या. हे दाम्पत्य गेल्या नऊ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्याला आहे. शशिकला यांच्या कुटुंबीयांनी मात्र आपल्या जावयावरच संशय व्यक्त केला आहे. विवाहबाह्य संबंधातूनच जावयाने आपल्या मुलीची आणि नातवाची हत्या केली असल्याचा आरोप शशिकला यांच्या आईने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या