महिन्याभरात दोन वाघिणींचा शॉक लागून मृत्यू

26

सामना ऑनलाईन | नागपूर

नागपुरात वाघिणीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अलापल्ली वनक्षेत्रामध्ये चामोर्शीजवळ मोराडा जंगलातील एका शेतामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वाघिणीची शिकार करण्यात आली असावी अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. २१ दिवसांपूर्वीच वर्ध्यातील अंभोरा येथे एका वाघिणीचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे समोर आले होते, तर वर्षभरात सहा वाघांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अलापल्ली वनक्षेत्रात चामोर्शीजवळ मोराडा जंगलातील शेतात शुक्रवारी वाघीण आणि रानडुकराचा मृतदेह आढळून आला. रानडुकराची शिकार करताना शॉक लागून वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही प्राण्यांचे मृतदेह ओढत आणून शेताबाहेर टाकल्याचे दिसून येत होते. दरम्यान, या घटनेची चौकशी केली जात असल्याचे गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षकांनी सांगितले.

रेडिओ कॉलर लावलेल्या नरभक्षक वाघिणीला १२ ऑगस्टला अरमोरीच्या जंगलात पकडण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑगस्टला तिला छपराला अभयारण्यात सोडले होते. या वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तर एक व्यक्ती जखमी झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या