‘वन नेशन वन इलेक्शन’च्या बैठकीवर ‘या’ पक्षांचा बहिष्कार

29
rahul-akhilesh-and-mayawati

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘वन नेशन वन इलेक्शन’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीवर काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पक्ष यांनी बहिष्कार घातला आहे.

बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्वीट करून या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची कारणे सांगितली आहेत. लोकशाहीत निवडणूक ही समस्या असूच शकत नाही आणि खर्चावरून त्याची तुलना करून मुल्यमापन करता येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, भाजप, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्षाने मात्र या बैठकीसाठी हजेरी लावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या