सीएसटीजवळ इमारतीचा भाग कोसळला; ढिगारा हटवण्याचे काम सुरू

मुंबई सीएसटीतील जनरल पोस्ट ऑफीस कार्यालयजवळ एका इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळाली आहे. गणेश चाळ, लकी हाऊसजवळ असणाऱ्या भानुशाली या पाच मजली इमारतीचा काही भाग संध्याकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र, काहीजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संध्याकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या. बचाव पथक, 6 जेसीबा मशीन, 10 डम्पर, 50 मजूर सहाय्यक अभियंता आणि दोन उपअभियंते दाखल झाले आहेत.

ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता असल्याने ढिगारा हटवण्याचे कामाला वेग देण्यात आला आहे.ही इमारत म्हाडाने रिकामी केली होती. तसेच त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. म्हाडाने इमारत रिकामी केली असली तरी काहीजण इमारतीत राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या