अहमदपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपीला अटक

3072

अहमदपुर येथील एक महिला व तिचा साथीदार अनैतिक संबंधाची चित्रफीत बनवून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व खंडणी वसूल करत होते. याबाबत तक्रारदाराने त्यांना बोलावत पोलिसांना याची माहिती दिली. या आरोपीला अहमदपुर पोलिसांनी रंगेहात पकडले.

शिवाजी नरसिंग खांडेकर (वय 45) यांने 7 डिसेंबर रोजी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात म्हटले आहे की, मला राजू किशन जाधव नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर फोन केला. तुमच्या व्याह्यांची संभोगाची व्हिडीओ क्लिप बनवली असून प्रकरणात तडतोड करण्यासाठी 20 लाख रुपये द्या. प्रकरणात तडजोड करण्यासाठी संपर्क करा, असे तो म्हणाला. तसेच त्याने भेट घेण्यासाठी बोलावले. त्याच दिवशी प्रियदर्शनी विद्यालय टेंभूर्णी रोड अहमदपुर येथे त्याला मैदानात बोलावले. यावेळी मी एकटाच भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी सदर प्रकरण मिटविण्याकरीता सुनिता विजय मस्के व त्यांचा मित्र राजु किशन जाधव यांनी मला 20 लाख रूपये खंडणी मागितली. याबाबत आपले व्याही यांना विचारणा केली असता ही घटना बाईच्या राजीखुशीने झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्याला विनाकारण अडकवण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे, असे ते म्हणाले.

7 डिसेंबरपासून दररोज ती महिला आणि राजू किशन जाधव सकाळी 10 वाजल्यापासून संपर्क करुन तुमच्या व्याह्याची नौकरी घालवायची नसेल तर आम्हाला 20 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्या व्याह्यांची बदनामी करुन क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. माझी आणि व्याह्यांची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या