मेफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला भवानी पेठेतून अटक

भवानी पेठ परिसरात मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून 62 हजार रूपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. आसीफ युसूफ खान (वय 36 वर्षे रा. भवानी पेठ पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भवानी पेठेत एकजण मेफेड्रोन अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पुर्व) च्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आसिफला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12. 370 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कामगिरी सहपोलीस निरीक्षक ढेंगळे, राहीगुडे, बोमादंडी,साळुंखे, शिंदे, दळवी, छडीदार यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या